दिल्लीत आठ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार, 8 year old girl allegedly gang-raped in Delhi

दिल्लीत आठ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार

दिल्लीत आठ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशाच्या राजधानीत बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. दिल्लीच्या राणीबाग परिसरामध्ये एका आठ वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार घटना घडली. धक्कादायक बाब अशी की, या कृत्यामध्ये त्या बालिकेचा १३ वर्षांचा नातलगही सामिल असल्याचा संशय आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी एकाचे नाव धर्मेंद्र (वय २०) असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर, दुसऱया अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
बालिकेच्या पालकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडित बालिकेला रुग्णआलयात दाखल केले असून वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 24, 2013, 09:52


comments powered by Disqus