Last Updated: Saturday, May 11, 2013, 19:32
www.24taas.com, सालेम तामिळनाडूमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. ४१ वर्षीय व्यक्तीनं ८० वर्षाच्या महिलेवर बलात्कार केलाय. या महिलेला गंभीर अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलंय.
पीडित ८० वर्षीय महिला विधवा असून गोपालापुरममध्ये आपल्या घरात एकटीच राहत होती. ती सध्या हॉस्पीटलमध्ये जगण्यासाठी संघर्ष करतेय. बलात्कार करणारा आरोपी एक भाजीविक्रेता आहे. ही घटना उघडकीस आल्यावर स्थानिक लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलंय. पोलिसांनी त्याला अटक केलीय आणि त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी मध्यरात्री पलानीवल यानं या वृद्ध महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि तिच्याकडे पाणी मागितलं. महिलेनं पाणी देण्यासाठी नकार दिला. तेव्हा क्रूद्ध होत त्यानं घरात जबरदस्तीनं प्रवेश केला आणि कथित रुपात महिलेवर बलात्कार केला. डॉक्टरांना महिलेच्या गुप्तांगावर जखमाही आढळल्यात. पलानीवलला दोन पत्नी आणि चार मुलं आहेत.
शेजारी राहणाऱ्या लोकांनी अॅम्ब्युलन्स बोलावून महिलेला अत्तूर सरकारी हॉस्पीटलमध्ये पोहचवलं. त्यानंतर तिला मोहन कुमारमंगलम मेडिकल कॉलेज हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलेची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 11, 2013, 19:32