Last Updated: Saturday, February 22, 2014, 11:12
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबईआधार कार्डला गॅस कनेक्शन जोडण्याची योजना तूर्तास स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आहे.
ज्या लोकांनी अजून गॅस कनेक्शनवर आधार कार्डचा नंबर दर्शवलेला नाही, त्यांनाही सब्सिडीचे सिलेंडर मिळणार आहेत.
गॅस कनेक्शन आणि आधार यांची जोडलेली लिंक डी-लिंक करण्याचे आदेश याच आठवड्यात देण्यात येणार आहेत.
लोकसभेत शुक्रवारी पेट्रोलियअम मंत्री एम. वीरप्पा माईली यांनी ही माहिती दिली आहे.
तसेच एकाच पत्त्यावर दोन गॅस कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांनी, आपल्या घरात दोन किचन असल्याचं प्रतिज्ञापत्र लिहून दिलं, तर त्यांचं दुसरं कनेक्शन वाचू शकेल.
या दरम्यान २५ फेब्रुवारीपासून गॅस एजन्सीवाल्यांनी संप पुकारला आहे.
तसेच यूआयडीएआयचे चेअरमन नंदन नीलकेणी हे पदाचा राजीनामा देणार आहेत, ते काँग्रेसकडून बंगळुरूमधून निवडणूक लढवणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 22, 2014, 11:12