अखेर ‘अग्नी-२’ची चाचणी यशस्वी, Aagni-2 successfully launched

अखेर ‘अग्नी-२’ची चाचणी यशस्वी

अखेर ‘अग्नी-२’ची चाचणी यशस्वी
www.24taas.com, ओडिसा

ओडिसा इथं नुकतीच ‘अग्नी-२ स्ट्रेजिक बैलिस्टिक’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. भुवनेश्वरपासून साधारण २०० किलोमीटर अंतरावर भद्रक जिल्ह्यामध्ये ही चाचणी घेण्यात आली.

मध्यमदूरीच्या या क्षेपणास्त्र याआधीचं सेनेत सामिल करण्यात आलं आहे. हे क्षेपणास्त्र २,००० किलोमीटर दूर जातं. तर यात उच्च गुणवत्ता असलेल्या नेव्हिगेशन सिस्टम आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा उपयोग करण्यात आला आहे.

या क्षेपणास्त्राचं वजन १७ टन असून हल्ल्यासाठी तयार व्हायला याला अवघी १५ मिनिट लागतात. या क्षेपणास्त्राची यापूर्वी १९९० व २०१० मध्ये याच क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी ठरली होती. त्यानंतर यंदा हीच चाचणी यशस्वीरित्या पार पडली.

First Published: Tuesday, April 9, 2013, 15:50


comments powered by Disqus