`आप`चा शनिवारी `जनता दरबार`, भ्रष्टाचाराच्या ४ हजार तक्रारी, corruption complaints in New Delhi

`आप`सरकारचा शनिवारी `जनता दरबार`, भ्रष्टाचाराच्या ४ हजार तक्रारी

`आप`सरकारचा शनिवारी `जनता दरबार`, भ्रष्टाचाराच्या ४ हजार तक्रारी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारने लोकांच्या समस्या मार्गी लावण्याचा धडाका सुरू केला आहे. जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी शनिवारी जनता दरबार भरणार आहे. तर भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्यासाठी सुरु केलेल्या हेल्पलाइनला पहिल्या सात सातांमध्ये जवळ जवळ चार हजार फोन कॉल आले आहेत.

दिल्ली सरकारने गुरुवारी भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ०११-२७३५७१६९ ही हेल्पलाइन सुरु केली होती. पहिल्याच दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत तीन हजार ९०४ फोन कॉल आले, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. या तक्रारींपैकी ५३ तक्रारी भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी होत्या. तर ३८ दिल्लीकरांनी भ्रष्टचाराचे स्ट्रिंग ऑपरेशन करण्याची तयारी दाखवल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

हेल्पलाइनला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे फोन कॉल स्वीकारणाऱ्यांची संख्या शुक्रवारपासून ३० करण्यात येणार आहे. तक्रारी घेण्यासाठी १५ जण नियुक्त करण्यात आले होते. आलेल्या तक्रारींवर २४ तासांमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे. तसेच प्रत्येक शनिवारी संपूर्ण मंत्रिमंडळ जनतेच्या तक्रारी ऐकूण घेण्यासाठी सकाळी ९.३० ते ११ या वेळेत उपलब्ध असेल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 9, 2014, 23:07


comments powered by Disqus