Last Updated: Monday, September 30, 2013, 09:24
www.24taas.com, झी मीडिया, जोधपूरअल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आसाराम बापू यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपतेय. त्यांना आज जोधपूरच्या न्यायालयात हजर केलं जाईल.
गेल्या महिनाभरापासून आसाराम बापू तुरुंगात आहेत. यापूर्वी ज्येष्ठ आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी बाजू मांडूनही आसाराम बापूंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आज त्यांना दिलासा मिळतो का? याकडे सर्वांच लक्ष आहे.
इंदूरच्या आश्रमात अटक झाल्यानंतर आसाराम बापूंना जोधपूर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दुसरीकडे आसाराम बापूंचा सेवक शिवा याच्या जामीन अर्जावर ४ ऑक्टोबरला सुनावणी आहे. तर छिंदवाडा येथील आश्रमाची वॉर्डन शिल्पी हिला आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, September 30, 2013, 09:24