`महिला जिन्स घालून पुरुषांना भुलवतात`, abdul razak mulla on jeans

`महिला जिन्स घालून पुरुषांना भुलवतात`

`महिला जिन्स घालून पुरुषांना भुलवतात`
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘महिलांसाठी सलवार-कमीज हाच पोषाख योग्य आहे. त्यांनी उगाचच जीन्स घालून पुरुषांना भुलवू नये’ असा अनाहूत सल्ला एका आमदारानं दिलाय. हा आमदार म्हणजे पश्चिम बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेता अब्दुल रझाक मुल्ला...

पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेत. ‘रवींद्रनाथ टागोरांच्या काळात त्यांच्या कुटुंबातील महिला जे कपडे घालायच्या तो पोषाख महिलांसाठी योग्य आहेत, असे मला वाटतं. सध्याच्या काळात सलवार-कमीज ठीक म्हणता येईल. पण जीन्सची गरज नाही. महिलांनी जीन्स घालू नयेत आणि पुरुषांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू नये,’ असे मुल्ला म्हणाले.

यावेळी असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या महिला सशक्तीकरणाच्या कामाची तोंडभरून कौतुक करण्यात मात्र ते विसरले नाहीत. मुल्ला यांच्या या वक्तव्याने त्यांच्यावर मात्र टीकेची झोड उठलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 1, 2013, 23:46


comments powered by Disqus