Last Updated: Saturday, October 13, 2012, 21:48
www.24taas.com, कोलकातापश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे उमेदवार अभिजीत मुखर्जी विजयी झाले. अभिजीत यांनी २ हजार ५३६ मतांनी विजय मिळविला आहे.
प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदी झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे काँग्रेसकडून याठिकाणी अभिजीत मुखर्जी यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर विजय मिळवित काँग्रेसने ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे.
अभिजीत यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुझफ्फर हुसेन यांचा पराभव केला. मात्र, हुसेन यांनी मुखर्जींना जोरदार टक्कर दिली. या जागेसाठी १० ऑक्टोबरला निवडणूक घेण्यात आली होती. प्रणव मुखर्जी हे २००४ आणि २००९ असे दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते.
First Published: Saturday, October 13, 2012, 21:48