विवाहाचा प्रस्ताव धुडकावला म्हणून अॅसिड हल्ला! Acid attack on 20-yr-old woman in Kendrapada

विवाहाचा प्रस्ताव धुडकावला म्हणून अॅसिड हल्ला!

विवाहाचा प्रस्ताव धुडकावला म्हणून अॅसिड हल्ला!
www.24taas.com, झी मीडिया, ओडिसा

विवाहाचा प्रस्ताव धुडकावून लावणाऱ्या तरुणीवर एका २७ वर्षीय युवकानं अॅसिड ओतलंय. ओडिसामध्ये ही घटना घडलीय. केवळ २० वर्षांची असलेल्या या पीडित तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

अॅसिड हल्ल्यात ही तरुणी ४० टक्यांपेक्षा जास्त भाजलीय. या तरुणीला सुरुवातीला स्थानिक हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु, प्रकृती आणखी बिघडल्यानंतर तिला कटकच्या श्रीरामचंद्र भंज हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं.

पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तटवर्ती जिल्ह्याच्या केंद्रपाडाच्या बदनौकना गावात हे कुटुंब राहतं. २७ वर्षीय आलेखा मंडल या तरुणानं या तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. परंतु, तरुणीनं ती नाकारली. यामुळे चिडलेल्या मंडलनं तरुणी आपल्या घरात झोपली असताना तिच्या घरात घुसला. त्यानं सोबत आणलेली अॅसिडची बाटली तिच्यावर रिकामी केली आणि तिथून पळ काढला.

आरोपी मंडल हा रांगनी गावाचा रहिवासी आहे. तरुणीनं आणि तिच्या कुटुंबीयांनी त्यानं मांडलेला लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर त्यानं या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

राजनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बिरंची बाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅसिड हल्ल्यानंतर आरोपी मंडल फरार झालाय. पोलिसांची एक टीम आरोपीचा शोध घेत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 7, 2013, 17:05


comments powered by Disqus