आसाराम बापू केसच्या साक्षीदारावर अॅसिड हल्लाAcid attack on witness in rape case against Asaram

आसाराम बापू केसच्या साक्षीदारावर अॅसिड हल्ला

आसाराम बापू केसच्या साक्षीदारावर अॅसिड हल्ला
www.24taas.com,पीटीआय, सुरत

सध्या जोधपूरच्या जेलमध्ये बंदी असलेल्या आसाराम बापूंच्या केसमधील साक्षीदारावर अॅसिड हल्ला झालाय. आसाराम बापूविरोधात सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात साक्षीदार असलेल्या दिनेश भावचंदानी (३९) यांच्यावर रविवारी वेसु परिसरात दोन अज्ञातांनी अॅसिड हल्ला केला. बाईकवरुन आलेल्या दोघांनी वेगानं पुढं येवून अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दिनेश यांना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्कार खटल्यातील साक्षीदारांवर अॅसिड हल्ला होण्याची ही तिसरी घटना आहे. पोलीस उपायुक्त शोभा भुतडा यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.

आसाराम बापू आणि नारायण साईच्या खटल्याशी संबंधित साक्षीदारांना संरक्षण देण्यात आलंय. पण तीन साक्षीदारांनी पोलीस वारंवार सांगत असूनही संरक्षण स्वीकारलं नव्हतं. नेमक्या त्याच साक्षीदारांवर अॅसिड हल्ले झाले आहेत. सूरतच्या एका महिलेनं आसारामवर १९९७ ते २००६ दरम्यान लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिलेच्या धाकट्या बहिणीनं नारायण साईवर दीर्घकाळ लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात सप्टेंबर २०१३ मध्ये आसारामला (७२) अटक करण्यात आली.

दरम्यान, यंदा पहिल्यांदाच आसाराम बापूंना होळी जेलमध्येच साजरी करावी लागतेय. दरवर्षी मोठ्या प्रमाणात आसाराम बापू होळी साजरी करत होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Monday, March 17, 2014, 14:46


comments powered by Disqus