दिल्लीतील घातपाताचा कट पोलिसांनी उधळला, action plan In New Delhi

दिल्लीतील घातपाताचा कट पोलिसांनी उधळला

दिल्लीतील घातपाताचा कट पोलिसांनी उधळला
www.24taas.com,नवी दिल्ली

दिल्लीत आणखी एक घातपाताचा कट उधळण्यात पोलिसांना यश आलंय. सचिवालय परिसरातून दिल्ली पोलिसांनी ८ बॅग जप्त केल्यात. या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात छर्रे सापडलेत. बॉम्ब बनवण्यासाठी छर्रे वापरले जातात... रात्री पोलीस गस्तीदरम्यान या बॅग जप्त करण्यात आल्यात.

दिल्लीत २६/११ सारख्या मोठ्या घातपाताचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळला गेलाय. शुक्रवारी इथल्या एका गेस्टहाऊसमधून जप्त केलेला शस्त्रसाठा आणि स्फोटकं यामुळं दहशतवाद्यांचे मनसुबे उद्धवस्त झालेत.

एक खोली, एका घातपाताचा कट आणि दिल्लीत घडलं असतं २६/११. दिल्लीतल्या जामा मशिद परिसरातल्या अराफत गेस्ट हाऊसच्या खोली नं. ३०४ मध्ये दहशतीचा शस्त्रसाठा सापडला... दहशतवाद्यांनी राजधानीला हादरवण्याचे क्रूर मनसुबे आखले होते... गोरखपूरमधून अटक करण्यात आलेला दहशतवादी लियाकत शाह या प्रकरणी एकामागून एक धक्कादायक माहिती उघड करतोय.

दिल्लीत २६/११ प्रमाणे रक्ताची होळी खेळण्याचा डाव दहशतवाद्यांनी आखला होता. २६/११ प्रमाणे या घातपाताचा कटही पाकिस्तानात शिजल्याची माहिती लियाकतनं दिल्याचं बोललं जातंय.

First Published: Sunday, March 24, 2013, 09:30


comments powered by Disqus