Last Updated: Saturday, July 20, 2013, 23:50
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीप्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात न उतरता, राजकारणात आपला रिमोट कंट्रोल चालवणा-या ठाकरे घराण्याची नवी पिढी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार झाली आहे. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भविष्यात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील उद्योगपतींसमोर हिंदीतून भाषण करून चांगली छाप पाडली, पण त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे देखील मागे राहिले नाहीत. या संमेलनात मध्येच उठून युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेही बोलले. युवकांच्या प्रश्नांवर पंतप्रधानांना सल्ला देण्यासाठी युथ कौन्सिल हवं, अशी मागणी करून ज्युनिअर ठाकरेंनी आपली चमक दाखवली.
युवकांचे प्रश्न हिरीरीनं मांडणारे आदित्य ठाकरे बोल्ड आणि बिनधास्त असल्याचा प्रत्ययच यानिमित्तानं आला. आजोबा बाळासाहेब ठाकरे तसंच वडील उद्धव ठाकरे हे जरी निवडणुकीत स्वतः कधी उतरले नसले, तरी आदित्य ठाकरे मात्र निवडणुकीला उभं राहाण्याचे संकेत दिले आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, July 20, 2013, 23:50