Last Updated: Thursday, June 20, 2013, 20:40
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची बहुचर्चित भेट आज संघाच्या मुख्यालयात अखेर पार पडली. सुमारे तासभर या दोघांमध्ये चर्चा झाली.
या चर्चेचा तपशील अद्याप कोणीच अधिकृतरित्या जाहीर केला नसला, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अडवाणींनी आपली नाराजी भागवत यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. नरेंद्र मोदींची निवड एकमतानं व्हायला हवी होती, असं अडवाणी म्हणाल्याचं समजतंय.
तसंच जेडीयूला NDAसोबत ठेवण्यासाठी आणखी प्रयत्न व्हायला हवा होता अशी भावनाही अडवाणींनी बोलून दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. अडवाणी आजारी असल्याने यांची बुधवारी भेट होऊ शकली नव्हती. याबाबत भागवत यांनी `ते भेटायला आले, तर भेटू` असे तटस्थपणे सांगितले होते. त्यामुळे यांच्यातील बहुचर्चित भेट होणार का याची उत्सुकता होती.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना भाजपचे प्रचारप्रमुख केल्यावर रागावलेल्या अडवानींनी तडकाफडकी पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिले होते. मात्र, अडवानी यांना अवघ्या २८ तासांत पांढरे निशाण फडकवावे लागले होते. ज्यांच्या एका दूरध्वनीने अडवानींची नाराजी दूर करण्याची किमया साधली होती. त्यानंतर त्यांची ही पहिली भेट आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 20, 2013, 20:40