अडवाणींचा राजीनामा नामंजूर Advani`s resignation resused

अडवाणींचा राजीनामा नामंजूर

अडवाणींचा राजीनामा नामंजूर
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपच्या संसदीय बोर्डानं अडवाणींचा राजीनामा फेटाळलाय. कुठल्याही परिस्थितीत अडवाणींचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंहांनी स्पष्ट केलंय. अडवाणींच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक झाली. त्यानंतर राजनाथ सिंहांनी ही माहिती दिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचा राजीनामा दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार असून त्यासाठी उद्या दिल्लीला जाणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते नितीन गडकरींनी दिलीय. अडवाणींची मनधरणी करण्यासाठी मोदींनी अडवाणींना फोन केला. अडवाणींनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती मोदींनी केलीय. मोदींची अडवाणींशी फोनवर सविस्तर चर्चा झाली.

अडवाणींचा राजीनाम्याचा निर्णय बदलण्याचा आग्रह मोदींनी केला. अडवाणी भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग करणार नाहीत, अशी आशा मोदींनी व्यक्त केलीय. नरेंद्र मोदींनीच स्वतः ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. तसंच वेळेअभावी आपण संसदीय बोर्डाच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही. मात्र पक्ष जो निर्णय़ घेईल तो आपल्याला मान्य असेल असंही मोदींनी सांगितलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

First Published: Monday, June 10, 2013, 23:44


comments powered by Disqus