`कसाबला फाशी... आता अफजल गुरुचाही नंबर`, Afzal Guru, next after Ajmal Kasab?

`कसाबला फाशी... अफजल गुरुचं काय?`

`कसाबला फाशी... अफजल गुरुचं काय?`
www.24taas.com, नवी दिल्ली

कसाबच्या फाशीवर भाजपानं आनंद व्यक्त करत, मुंबई हल्ल्यातील पीडितांनी आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही हीच भावना व्यक्त करताना संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुचं काय? असा सवाल केंद्र सरकारला केलाय. अजमल कसाबनंतर आता अफजल गुरुच्या फाशीवरही लवकरात लवकर शिक्कामोर्तब व्हावं, अशी मागणी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केलीय.

‘भारत सक्षम आहे... हा संदेश कसाबला फाशी दिल्यामुळे संपूर्ण जगाला पोहचलाय’ अशी प्रतिक्रिया भाजपा नेते शाहनवाज हुसैन यांनी दिलीय. मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनीही या निर्णयावर आनंद व्यक्त केलाय. कसाबला लवकरात लवकर फाशी मिळावी, ही भाजपची अनेक दिवसांपासून मागणी होती. पण आता कसाबला फाशी दिल्यानंतर भाजपा केंद्र सरकारचं अभिनंदन करत आहे, असं त्यांनी म्हटलंय.

भाजपाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर, यांनीही मोदींचीच मागणी पुढे रेटत, आता अफजल गुरुलाही लवकरात लवकर फासावर लटकवण्यात यावं, अशी मागणी केलीय.

First Published: Wednesday, November 21, 2012, 10:55


comments powered by Disqus