आवाज सोनियांचा, अॅटर्नी जनरलना धमकी , AG gets hoax call from woman imitating Sonia, Police probe o

आवाज सोनियांचा, अॅटर्नी जनरलना धमकी

आवाज सोनियांचा, अॅटर्नी जनरलना धमकी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

चक्क एका महिलेने आपला आवाज सोनिया गांधी यांच्या नावावर खपवून अॅटर्नी जनरल वहानवटी यांना धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा हुबेहूब आवाज काढून एका महिलेने वहानवटी यांना धमकीच दिली. या धमकीचा तपास पोलीस करीत आहेत. सोनिया गांधी अमेरिकेत उपचारासाठी असताना वहानवटी यांना धमकीचा फोन आला होता, असं वृत्त पीटीआयने दिले आहे.

आपले काम योग्यरीतीने होताना दिसून येत नाही. अनेक प्रकरणांत केंद्र सरकारची मानहानी होत आहे. शक्य झाल्यास आपण बाजूला व्हायला हवे, असे सोनियांच्या नावाचा आवाज काढणाऱ्या महिलेने म्हटले आहे. या दूरध्वनीची वहानवटी यांनी खातरजमा करण्याचा प्रयत्न केला असता, तो फोन सोनिया गांधी यांनी केलेला नसल्याचे निष्पन्न झाले.

सोनिया गांधी यांनी न केलेल्या दूरध्वनीच्या प्रकाराची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या प्रवक्त्यां नी केली आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण दाखल झाल्यानंतर ते सायबर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यास सार्वजनिक हित समोर ठेवून लवकरात लवकर ती आपल्यासमोर मांडू, असे प्रवक्त्या्ने स्पष्ट केले.

बनावट कॉल हा कोळसा वाटप गैरव्यवहार खटल्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असावा, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी या प्रकरणाबाबत म्हटले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 24, 2013, 09:18


comments powered by Disqus