Last Updated: Saturday, September 14, 2013, 09:06
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली आरबीआयचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सूत्रं हातात घेतल्यानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया सावरला तसंच जागतिक बाजारातही कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, त्यामुळे पेट्रोलची किंमत कमी होणार अशी आशा व्यक्त केली जात होती. पण, घडलंय उलटचं... पेट्रोलची किंमत कमी झाली नाहीच पण ती वाढलीय.... पेट्रोल पुन्हा एकदा १.६३ रुपयानं महागलंय.
पेट्रोलचे नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू झालेत. जून महिन्यापासून पेट्रोलची ही सातवी दरवाढ आहे. जूनपासून पेट्रोल १०.८० रुपयांनी (व्हॅट आणि स्थानिक कर वगळून) महागलंय. त्यामुळे महागाईत भरच पडणार आहे. पेट्रोल १.६३ रुपयांनी महागलं असलं तरी व्हॅट आणि इतर करांचा समावेश करता लिटरमागे दोन रुपयांपेक्षा जास्त दरवाढ झालीय.
आता मुंबईत ८१.५७ रुपयांनी मिळणारं पेट्रोल आता ८३.६३ रुपयांनी मिळणार आहे तर औरंगाबादमध्ये हाच दर ८३.३३ रुपये असेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, September 14, 2013, 09:06