आता केजरीवालांच्या विरोधात आंदोलन.. , Agitation against Arvind Kejriwal government

आता केजरीवालांच्या विरोधात आंदोलन..

आता केजरीवालांच्या विरोधात आंदोलन..

www.24taas.com , झी मीडिया , नवी दिल्ली,

अरविंद केजरीवालांनी निवडणुकीपूर्वी कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आश्वासन दिलं होत. केजरीवालांनी कंत्राटी कामगारानां दिलेल आश्वासन पूर्ण न केल्यामुळे, कंत्राटी कामगारांनी केजरीवालांच्या विरोधात आंदोलनाचं शस्त्र उगारलं आहे. त्यामुळे दिल्लीतील सरकारी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.

निवडणुकीपूर्वी केजरीवालांनी दिलेल्या शब्दामुळे कंत्राटी कामगारांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण केजरीवालांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे भ्रमनिरास झालेल्या कंत्राटी कामगारांनी केजरीवालांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. त्यानंतर केजरीवालांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

त्यावेळी या प्रश्नी एक समिती स्थापन कलेली आहे आणि समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी ३-४ महिने वेळ लागेल असं केजरीवालांनी म्हटलंय. आंदोलनकर्त्यांची केजरीवालांनी आज सकाळी भेट घेतली. त्यावेळी ही बाब केजरीवालांनी स्पष्ट केली.

अरविंद केजरीवाल यांनी प्रस्थापित केंद्र सरकारवर भ्रष्टाचार , दफ्तरदिरंगाई ,अकार्यक्षमता या सारखे आरोप केले. केवळ आरोप करून न थांबता ,जनचळवळीच्या माध्यमातून सरकार विरोधी वातावरण निर्माण केले.

राजकारण जर घाण असेल तर प्रसंगी राजकारणात उतरून घाण स्वच्छ करायला हवी . असं म्हणत केजरीवालांनी अण्णांपासून फारकत घेतली, राजकारणात उतरलेले केजरीवाल जनतेला स्वप्न दाखवू लागले.

जनतेनेही ह्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सत्ता केजरीवालांच्या हातात दिली. पण आता मात्र जसं आंदोलन केजरीवालांनी केलं, तसंच आंदोलन आता केजरीवालांच्या विरूद्ध केली जात आहेत .

दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी जर केजरीवालांना समिती नेमावी लागत असेल तर आश्वासन देण्यापूर्वी त्यांनी विचार केला नव्हता काय ? केवळ लोकानुनयाच्या घोषणा केल्यामुळे केजरीवाल सरकारची दमछाक होते आहे. हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. असंच म्हणावं लागेल.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 30, 2014, 18:09


comments powered by Disqus