Last Updated: Wednesday, March 13, 2013, 19:16
www.24taas.com, नवी दिल्लीउन्हाळ्याच्या सुट्टीची चाहूल लागताच अनेक ट्रॅव्हल कंपन्या नवनव्या योजना काढतात. रेल्वे आणि विमान कंपन्याही नव्या योजना सुरू करतात. पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. यंदा एअर इंडियाने नवी योजना सुरू केली आहे. यामध्ये एसी ट्रेनच्या तिकिटाच्या किमतीत विमानाचा प्रवास करण्याची संधी एअर इंडिया देत आहे.
एअर इंडियाच्या एका प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली. एअर इंडियासारख्या सार्वजनिक क्षेत्रात मोडणाऱ्या कंपनीने तिकिटाचे दर एसी ट्रेनच्या टिकिट भाड्याएवढे ठेवले आहेत. त्यामुळे देशभरात प्रवास करताना विमान प्रवास स्वस्त होणार आहे. दिल्ली-मुंबई विमान प्रवास केवळ ३,९८१ रुपयांमध्ये शक्य होणार आहे. तर प्रथम वर्गाचा प्रवास ४,०२५ रुपये असेल.
एअर इंडियाने घोषणा केल्यापासून इतर विमान कंपन्यांनीही आपल्या तिकिटांच्या किमती स्वस्त करण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी स्पाइसजेट एअरवेजने फेब्रुवारीमध्ये कमी दरात विमान प्रवास करवणार असल्याची घोषणा केली होती.
First Published: Wednesday, March 13, 2013, 19:16