Last Updated: Wednesday, October 10, 2012, 14:16
www.24taas.com, बडोदा गुजरातमधील राष्ट्रवादीच्या या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे झाडून सगळे नेते हजर राहिले आहेत. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या बैठकीला अनुपस्थितीत राहिले.
राजीनाम्यानंतर अजीत पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजितदादांची ही अनुपस्थिती सगळ्यांच्याच डोळ्यात भरणारी होती. याबद्दल शरद पवार यांना विचारलं असता, अजितदादांना ‘ताप’ असल्यानं ते या बैठकीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. ‘अजितदादांची तब्येत ठिक नसल्याने, आम्हीच त्यांना येऊ नका’ असं सांगितल्याची पृष्ठीही शरद पवारांनी यावेळी जोडली.
‘मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवा’ असे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना निर्देश देतानाच शरद पवार यांनी `एकपक्षीय सत्तेचे दिवस गेले’ म्हणत काँग्रेसलाही गर्भित इशारा दिलाय. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत होते.
First Published: Wednesday, October 10, 2012, 13:36