राहुलवर बलात्काराचा आरोप : अखिलेश यादव अडचणीत, Akhilesh behind rape case against Rahul Gandhi’

राहुलवर बलात्काराचा आरोप : अखिलेश यादव अडचणीत

राहुलवर बलात्काराचा आरोप : अखिलेश यादव अडचणीत
www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेस महासचिव राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या बलात्कार खटल्याच्या मागे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा हात आहे, असा आरोप राहुल गांधी यांच्या वकिलांनी केलाय. त्यामुळे या खटल्याला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

राहुल गांधी यांच्यावर एका मुलीला बंधक बनवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याच खटल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलंय. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या प्रकरणामागे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा हात असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे अखिलेश यादव अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, २०११ मध्ये काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला हा खटला समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सांगण्यावरुन दाखल करण्यात आलाय.

समाजवादी पार्टीचे मध्यं प्रदेशातील माजी आमदार किशोर समरी्ते यांच्यातर्फे सर्वोच्च न्यावयालयात ही माहिती देण्याटत आली. समरीते यांनी २०१० मध्येा अलाहाबाद उच्च् न्यायालयात राहुल गांधींविरोधात याचिका दाखल केली होता. त्यात राहुल गांधींवर अमेठी येथील एका मुलीचे अपहरण करुन बलात्काचर केल्या चा आरोप केला होता. अलाहाबाद उच्चव न्या यालयाने ही याचिका रद्दबातल ठरविताना समरीते यांना ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. तसेच त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीचेही आदेश दिले होते. याविरोधात समरीपते यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सर्वोच्च न्याधयालयात सुनावणी दरम्या्न समरीते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांयच्याड वकील कामिनी जयस्वाल यांनी सर्वोच्च न्यावयालयाला सांगितले की, समरीते यांना राहुल गांधींविरोधात याचिका दाखल करण्यानचे निर्देश `पंडारा रोड` येथून मिळाले होते. यावर न्याधयालयाने विचारणा केली की, पंडारा रोड म्हिणजे काय? स्पाष्टन करुन सांगा. त्यायनंतर जयस्वाल म्हाणाल्या, ‘उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यणमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते’.

First Published: Tuesday, September 11, 2012, 12:43


comments powered by Disqus