Last Updated: Monday, July 15, 2013, 13:36
www.24taas.com, झी मीडिया, जम्मू अमरनाथ यात्रा सुरू झालीय. अजूनही एक महिन्याची यात्रा बाकी असतानाच अमरनाथचं पवित्र शिवलिंग विरघळलंय. यावेळी फक्त आठ फुटांचं बर्फाचं शिवलिंग तयार झालं होतं. मात्र, वेळेआधीच हे शिवलिंग वितळलंय.
अमरनाथ यात्रा पूर्ण होण्यासाठी ३८ दिवसांचा अवधी बाकी राहिले असतानाच बाबा बर्फानी वितळलेत. अमरनाथ गुहेच्या परिसरात तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचल्याने ते लवकर विरघळलं असावं अशी शक्यता वर्तवली जातेय. आत्तापर्यंत जवळजवळ दोन लाख लोकांनी अमरनाथ गुंफेमध्ये जाऊन या शिवलिंगाचं दर्शन घेतलंय.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला सुरु झालेली ही यात्रा २४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. अमरनाथ गुंफा समुद्रसपाटीपासून जवळजवळ ३८८८ मीटर उंचावर आहे. जम्मू आणि काश्मीर या राज्यातील श्रीनगरच्या उत्तर पूर्वेला स्थित असलेली ही गुंफा ११ मीटर उंच, १९ मीटर लांब आणि १६ मीटर रुंद आहे. प्राकृतिकरित्या इथं बर्फाचं शिवलिंग तयार होतं. चंद्राच्या बदलत्या आकारमानानुसार या बर्फाचा आकारही कमी होती आणि वाढतो. हे शिवलिंग पाहण्यासाठी इथं दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनाला येतात.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, July 15, 2013, 13:36