Last Updated: Saturday, October 27, 2012, 12:15
www.24taas.com, नवी दिल्लीकेंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागल्यानंतर अनेक केंद्रीय मंत्र्यांचे मंत्रीपदावर गदा येणार हे ओळखूनच मंत्र्यांनी आपले राजीनामे देण्यास सुरवात केली आहे. माहिती व प्रसारण मंत्री अंबिका सोनी आणि सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांनी आज सकाळी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे पंतप्रधानांकडे दिले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सोनी व वासनिक यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा केली. फेरबदल उद्या होत असून, त्यापूर्वी आणखी काही मंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळातील फेरबदलांपूर्वीच काल परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटक लोकायुक्तांनी कृष्णा यांच्यावर गुरुवारीच गंभीर आरोप केले होते.
First Published: Saturday, October 27, 2012, 11:34