अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार!, American tourist gang-raped in Manali: Police

अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार!

अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार!
www.24taas.com, झी मीडिया, सिमला

हिमाचल प्रदेशातील मनाली येथे एका अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार घडल्याची घटना घडली आहे. “एका ३० वर्षीय अमेरिकन पर्यटक स्त्रीवर सोमवारी रात्री काही ट्रक ड्रायव्हर्सनी सामूहिक बलात्कार केला. त्यांनी या महिलेला ‘लिफ्ट दिली होती.” असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

हिमाचल प्रदेशातील मनाली या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी सामूहिक बलात्काराची ही घटना घडली. वैद्यकीय चाचण्यांमधून महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलीस ट्रक ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतल आहेत.
बलात्कारीत महिलेला ट्रकचा नंबर आठवत नाही. तसंच ते आरोपी एकमेकांशी ज्या भाषेत बोलत होते, ती भाषाही तिला समजत नव्हती. त्यांनी ट्रक एका निर्जन स्थळी थांबवला. त्यानंतर सुमारे एक तास ते सर्वजण तिच्यावर बलात्कार करत राहिले. अशा घटनांमुळे भारताची प्रतिमा जगभरात खराब होत आहे. यापूर्वीही मध्यप्रदेशात स्विझर्लंडच्या सायकलस्वार महिलेवर बलात्कार झाला होता, तर दक्षिण कोरियातील पर्यटक महिलेवर मध्य प्रदेशातच बलात्कार झाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 4, 2013, 17:48


comments powered by Disqus