Last Updated: Tuesday, February 18, 2014, 16:47
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीतेलंगणा प्रश्नावरुन आता कॉंग्रेसच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण आंध्रचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी तेलंगणाच्या प्रश्नावर पार्टीपेक्षा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. किरण कुमार रेड्डी हे तेलंगणाप्रश्नी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन नव्या पार्टीची स्थापना करण्याच्या विचारात आहेत.
कॉंग्रेसला मात्र कुठल्याही परिस्थीतीत हे विधेयक संमत करायचंच आहे यामुळे रेड्डीच्या भुमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागलय.. तर दुसरीकडे कॉग्रेसचे विरोधक असलेले जगनमोहन रेड्डी यांनी सुरुवातीपासून आक्रमक होत कोंडी करण्याचा निर्णय घेतलाय.
त्य़ामुळे संसदेबाहेरची तेलगंणाप्रश्नी होत असलेली किरणकुमार रेड्डी आणि जगनमोहन रेड्डी होत असलेली आंदोलन सत्ताधा-यांना अडचणीत आणणारी ठरणार आहेत. तेलगंणाला विरोध कायम ठेवत जगनमोहन रेडडी आता विरोधी पक्षांचे मन वळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत
मायावतींचा तेलंगणाला पाठिंबातेलंगणाच्या मुद्यावरून आता राजकारण तापलं असून सर्वच पक्षांनी आता याप्रकरणी उडी घेतलीय. मायावतींनी तेलंगणाच्या निर्मितीला पाठिंबा दिलाय. तसंच उत्तर प्रदेश विभाजनाचीही लोकसभेत मागणी करणार असल्याची घोषणा मायावतींनी केलीय. तर आंध्र प्रदेशातले काँग्रेसच्या केंद्रीय मंत्र्यांनीही तेलंगणाच्या निर्मितीला तीव्र विरोध दर्शवलाय़.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 18, 2014, 16:47