अंजली दमानिया गडकरींविरोधात निवडणूक लढवणार

अंजली दमानिया गडकरींविरोधात निवडणूक लढवणार

अंजली दमानिया गडकरींविरोधात निवडणूक लढवणार

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं उमेदवारांची पहिली यादी तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

पहिल्य़ा यादीत काँग्रेस आणि भाजपच्या प्रमुख उमेदवारांच्या विरोधात आपल्या काही मुख्य उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींविरोधात आपच्या अंजली दमानिया मैदानात उरतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर राहुल गांधींना कुमार विश्वास हे आव्हान देण्याची शक्यता आहे.

मुंबईतून गुरुदास कामतांविरोधात मयांक गांधी लढणार आहेत. तर मीरा सन्याल या दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरांच्या विरोधात लढणार असल्याचं समजतंय.

दिल्लीतून केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्याविरोधात आशुतोष निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 16, 2014, 15:12


comments powered by Disqus