दिवसाढवळ्या भाजप नेत्याची क्रूर हत्या, another bjp leader shot dead in up this time in muzaffarnagar

दिवसाढवळ्या भाजप नेत्याची क्रूर हत्या

दिवसाढवळ्या भाजप नेत्याची क्रूर हत्या

www.24taas.com, झी मीडिया, मुजफ्फरनगर

उत्तरप्रदेशनच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात दोन अज्ञात हल्लेखोरांनी आज एका स्थानिक भाजप नेत्याची क्रूर हत्या केलीय.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त सैनिक आणि मीरापूरचे भाजपचे उपाध्यक्ष ओम वीर सिंह हे सकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास मॉन्टी क्रॉस रोडवर दोन हल्लेखोरांनी देशी पिस्तुलातून त्यांच्या गोळ्या झाडल्या... यामध्ये ते खूप गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडला.

ओम वीर यांनीही आपल्या लायसन्सधारी बंदुकीतून गोळी झाडली, यामध्ये एक हल्लेखोर जखमी झाला, असंही पोलिसांनी नमूद केलंय. त्यानंतर ओम यांच्याकडील रिव्हॉल्वर घेऊन दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. ओम वीर यांचं शव पोस्टमॉर्टेमसाठी पाठविण्यात आलंय.

या घटनेनंतर ओम वीर यांचे कुटंबीय आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार प्रदर्शनं केली त्यामुळे रोडही जाम झाला होता. यावेळी घटनास्थळावर दाखल झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रदर्शनकर्त्यांना या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करण्यात येईल, असा विश्वास दिला. या भागातील सुरक्षा वाढविण्यात आलीय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 10, 2014, 18:42


comments powered by Disqus