Last Updated: Monday, January 28, 2013, 19:36
www.24taas.com, गोपालगंजउत्तर भारतात काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या जुली-मटूकनाथ प्रेमप्रकरणाचा कित्ता गिरवत बिहारच्या गोपालगंज येथील महेंद्र दास महाविद्यालयाचे प्राचार्य संत रामदुलार दास यांनी त्यांच्याच एका विद्यार्थिनीशी लग्न केले आहे. प्राचार्यांच्या या लग्नाला आक्षेप घेत महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतर संघटना संतप्त झाल्या आहेत.
दास यांनी लग्न केल्यापासून त्यांचा कडाडून निषेध होत आहे. काही संघटनांनी दास यांच्या पुतळ्याचे दहन करुन त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. गरज भासल्यास उपोषणाचा इशाराही संघटनांनी दिला आहे.
महाविद्यालयातील निभा नावाच्याल विद्यार्थिनीशी दास यांनी जवळीक साधून सूत जुळवले. तिला त्यां नी गैरमार्गाने मदत करुन पदव्या मिळवून दिल्याय, असा आरोप संघटनांनी केला आहे. दास आणि निभा यांनी गेल्या १६ जानेवारीला विवाह केला. त्यालनंतर ते बेपत्ता झाले होते.
विवाहानंतर २१ जानेवारीला महाविद्यालयात परतल्याननंतर सर्वांना ही माहिती मिळाली. दास हे ६५ वर्षीय असून वय विवाहयोग्यद नसल्यािचे ते मानतात. परंतु, लग्नाानंतरही मी संतच राहणार असून संत परंपरा कायम ठेवणार असल्या चे त्यांयनी सांगितले. तर निभा म्हपणते की, लग्नारपूर्वी ती प्राचार्यांना सदगुरु मानत होती, आताही ती त्यां ना गुरुच मानते.
First Published: Monday, January 28, 2013, 19:36