Last Updated: Tuesday, March 12, 2013, 19:24
www.24taas.com, नवी दिल्लीबलात्कारविरोधी बिल पुन्हा रखडलंय. बिलामधल्या प्रस्तावांवर कॅबिनेटमध्ये काही मतभेद आहेत. त्यामुळे आता या बिलावर पुन्हा मंत्रीगट विचार करणार आहे. आज सगळ्यात जास्त विरोध झाला तो सहमतीनं शारीरिक संबंधांसाठीचं वय निश्चित करण्यावरुन....
महिलांवरच्या अत्याचारांविरोधातलं बिल संसदेच्या याच सत्रामध्ये मंजूर करणार असल्याचा दावा सरकार करतंय. पण या बिलासंदर्भात कॅबिनेटची विशेष बैठक निष्फळ ठरली. महिलांचा पाठलाग आणि लपून छपून फोटो काढण्याला गुन्हा ठरवायला अनेक जणांचा विरोध होता. बलात्काराऐवजी लैंगिक अत्याचार शब्द वापरायला आणि लैंगिक अत्याचाराची नेमकी व्याख्या ठरवण्याबद्दलही मतमतांतरं होती.
सहमतीतून शारिरीक संबंध ठेवण्यासाठीचं वय 18 वरुन सोळापर्यंत खाली आणण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध झाला. आता मंत्रिगट पुन्हा या बिलावर विचार करुन बुधवारी रात्रीपर्यंत अहवाल देईल. गुरुवारी पुन्हा कॅबिनेटच्या बैठकीत हा मुद्दा मांडला जाईल. आणि याच बिलासंदर्भात सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलीय.
First Published: Tuesday, March 12, 2013, 19:24