Last Updated: Tuesday, May 27, 2014, 17:54
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली दिल्लीच्या तिहार जेलमध्ये सध्या बंद असलेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा काही मिळालेला नाही.
केजरीवाल यांच्या अर्जावर दिल्ली हायकोर्टानं सुनावणी दरम्यान, केजरीवाल यांना जामीन बॉन्ड भरायलाच लागेल, असा आदेश दिलाय. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय स्वीकारत बॉन्ड भरण्याची तयारी दर्शवलीय. कोर्टाच्या सल्ल्यानुसार, गेल्या 7 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी अखेर `जामीन बॉन्ड` भरण्याची तयारी केलीय.
नितीन गडकरी अवमान प्रकरणी `जामीन स्वीकारणार नाही` असं म्हणत आपल्या भूमिकेवर अडून राहणारे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टानं चांगलाच झटका दिला. यानंतर त्यांनी बॉन्ड भरण्याची तयारी दर्शविली. हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांची म्हणणं तेव्हाच ऐकून घेता येईल जेव्हा केजरीवाल मॅजिस्ट्रेट गोमती मनोचा यांच्या निर्देशांचं पालन करत जामीन भरतील.
याचिकेत 21 आणि 23 मे रोजी मॅजिस्ट्रेटनं दिलेल्या आदेशांमध्ये केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याला आव्हान दिलं गेलं होतं. केजरीवाल यांनी जामीन मुचलका भरण्यासाठी नकार दिला होता. ज्यानंतर कनिष्ठ न्यायालयानं त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 27, 2014, 17:54