`असीमला सोडा नाहीतर ठिय्या आंदोलन`, arvind kejriwal protest for asim trivedi

`असीमला सोडा नाहीतर ठिय्या आंदोलन`

`असीमला सोडा नाहीतर ठिय्या आंदोलन`
www.24taas.com, नवी दिल्ली
अटकेत असलेले व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींविरोधातला देशद्रोहाचा खटला मागे घेतला नाही तर शनिवारपासून आर्थर रोड जेलमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिलाय.

मंगळवारी, आर्थर रोड जेलमध्ये केजरीवाल यांनी असीम त्रिवेदींची भेट घेतली. असीम देशद्रोही नाही, तर देशप्रेमी आहे, असं केजरीवाल म्हणाले. जे लोक कोळशाची चोरी करतात ते देशभक्त... तर चोरीच्या विरुद्ध कार्टून बनवलं तर तो देशद्रोही कसा होऊ शकतो, असा सवाल करत केजरीवालांनी हे खपवून घेतलं जाणार नसल्याचं म्हटलंय. शुक्रवारपर्यंत असीमवरील सर्व खटले माघारी घेऊन, त्यांची सुटका केली नाही, तर शनिवारपासून जेलबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. असीमला सोडा, अन्यथा आम्हाला आत टाका, असा पवित्रा केजरीवालांनी घेतलाय.

न्यायालयीन कोठडीत असलेले असीम त्रिवेदी सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आज जेल बाहेर मोठ्य़ा संख्येनं इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. असीम त्रिवेदींवरील देशद्रोहाचा आरोप मागं घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.

First Published: Tuesday, September 11, 2012, 14:12


comments powered by Disqus