केजरीवालांनी केली भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर, Arvind Kejriwal`s list of India`s most corrupt

केजरीवालांनी केली भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर...

केजरीवालांनी केली भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर...

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी देशातील भ्रष्टाचारी नेत्यांची एक यादीच सादर केलीय. यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांचा आणि नेत्यांचा समावेश आहे.

`आप`च्या कार्यकर्त्यांशी बोलताना केजरीवाल यांनी `आपलं उद्दीष्ट `आप` या पक्षाला नाही तर देशाला मजबूत बनवण्याचं` असल्याचं सांगितलंय. यासाठी आपण देशातील भ्रष्टाचाऱ्यांना निवडून देता कामा नये, असंही त्यांनी म्हटलंय.

यावेळी, या यादित राहुल गांधींच्या नावाचाही समावेश असायला हवा, असा आरडा-ओरडा कार्यकर्त्यांनी केल्यानंतर केजरीवाल यांनी `राहुल गांधीही त्यापैंकीच एक आहेत` असं म्हटलंय. ` देशातील या भ्रष्टाचारी व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आपण संसदेत पाऊल ठेऊ देता कामा नये` असं केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना बजावलंय. तसंच या यादीत नाव नसणाऱ्या आणखी भ्रष्टाचाऱ्यांची नावं समोर आणावीत असं आवाहनही केजरीवाल यांनी केलंय.

केजरीवाल यांची देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाऱ्यांची यादी
* सुरेश कलमाडी
* नितीन गडकरी
* सुशीलकुमार शिंदे
* बी. एस. येडुरप्पा
* कपिल सिब्बल
* मुलायम सिंग
* कमल नाथ
* विरप्पा मोईली
* अनंत कुमार
* अनुराग ठाकूर
* शरद पवार
* प्रफु्ल्ल पटेल
* पी. चिदंबरम
* अलागिरी
* कानिमोझी
* ए. राजा
* तरुण गोगोई
* मायावती
* नवीन जिंदाल




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 31, 2014, 13:12


comments powered by Disqus