केजरीवाल आणि खुर्शीद समर्थकांमध्ये तुफान हाणामारी, arvind kejriwal Vs khurshid

केजरीवाल आणि खुर्शीद समर्थकांमध्ये तुफान हाणामारी

केजरीवाल आणि खुर्शीद समर्थकांमध्ये तुफान हाणामारी
www.24taas.com, फारुखाबाद

फारुखाबादमध्ये केजरीवाल विरुद्ध खुर्शीद संघर्षानं आज हिंसक वळण घेतलं. अरविंद केजरीवाल फारुखाबादमध्ये करत असलेल्या निदर्शन स्थळाजवळ काँग्रेस कार्यकर्ते आणि आयएसीचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली.. खुर्शीदांच्या ट्रस्टमध्ये गैरव्यवहाराचे आरोप करणा-या केजरीवालांनी त्यांच्या मतदारसंघातच आता आंदोलन सुरु केलं होतं. फारुखाबादमध्ये या आणि परत जाऊन दाखवा, असं प्रतिआव्हान केजरीवाल यांना सलमान खुर्शीद यांनी दिलं होतं..

त्याचाच प्रत्यय आज फारुखाबादमध्ये पहायला मिळाला. इंडिया अगेंस्ट करप्शन यांच्या सदस्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच पाठलाग करुन मारहाण केली. केजरीवाल यांनी आपल्या टीमला व समर्थकांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.

केजरीवाल यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेल्या भारतीय किसान यूनियनचा कार्यकर्ता मुन्ना शुक्ला आणि त्याच्या समर्थकांवरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली.


First Published: Thursday, November 1, 2012, 19:38


comments powered by Disqus