Last Updated: Friday, August 30, 2013, 00:02
www.24taas.com, झी मीडिया, जोधपूरराजस्थानातल्या जोधपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलत्कार केल्याच्या आरोपात अडकलेल्या आसाराम बापूंनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर हल्ला चढवलाय. सोनिया आणि त्यांचे पूत्र राहुल यांच्या इशा-यावरुन आपल्याला अडकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
तसंच आपल्यावरील आरोप सिद्द झाल्यास ५ लाख रुपयांचं इनाम देऊ अशी घोषणाच आसाराम बापूंनी केली आहे. जोधपूरमधील आश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी त्यांच्यावर भादंवि कलम ३७६, ३४२, ५०६ लावले आहेत तसंच आयपीसी अंतर्गत ५०९ कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे.
न्यायालयाने त्यांना समन्स बजावलं असून ३० ऑगस्टपर्यंत हजर न झाल्यास अटक करण्यास सांगितलं आहे. मात्र पिडीत मुलगी मला नातीसारखी आहे असं बापू म्हणाले आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 30, 2013, 00:02