भक्त चरणी ठेवती माथा, आसाराम बापू मात्र मारती लाथा! Asaram bapu kicks his divotee

भक्त ठेवती चरणी माथा, आसाराम बापू मात्र मारती लाथा!

भक्त ठेवती चरणी माथा, आसाराम बापू मात्र मारती लाथा!
www.24taas.com, विदिशा

काही दिवसांपूर्वी दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुलीबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे आसामार बापूंनी वाद ओढावून घेतला होता. आता एका भक्ताला लाथ मारत आसारामा बापूंनी नवा वाद निर्माण केला आहे.

सोमवारी मध्य प्रदेशातील विदिशा येथे आसाराम बापूंचे प्रवचन होते. प्रवचनानंतर अमन सिंग डांगी नामक एक भक्त आसाराम बापूंच्या चरणी माथा ठेवण्यासाठी झुकले. मात्र आसाराम बापूंना चक्क त्याला लाथा झाडल्या. तसंच शिवीगाळही केली. आसाराम बापूंच्या रक्षकांनीही डांगी यांना लाथा मारत हाकलून लावलं. आपल्या प्रवचनातही आसाराम बापूंनी यमदेवाला उद्देशून शिवराळ भाषा वापरली होती. त्यामुळे आसाराम बापूंच हे वागणं संताचं की संतापाचं असा प्रश्न पडला आहे.

यापूर्वीही आसाराम बापूंनी अनेक वाद ओढावून घेतले होते. भक्तांचं लैंगिक शोषण, एका भक्तावर विषप्रयोग, एका तरुण भक्ताचा गूढ मृत्यू यांसारख्या घटनांमुळे आसाराम बापू यापूर्वीही वादांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यात अशा प्रकारे भक्ताला लाथा मारण्याची घटना पुढे आल्यावर आसाराम बापूंच्या संतप्रवृत्तीबद्दल निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

First Published: Wednesday, February 6, 2013, 16:44


comments powered by Disqus