आसाराम बापूंची पत्नी- मुलीसमोर होणार चौकशी , Asaram bapu`s wife and the girls in front of the inquiry

आसाराम बापूंची पत्नी- मुलीसमोर होणार चौकशी

आसाराम बापूंची पत्नी- मुलीसमोर होणार चौकशी
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या संत आसाराम बापूंच्या अनेक धक्कादाय गोष्टींचा उलगडा झाला आहे. आता तर लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून अटकेत असलेले आध्यात्मिक गुरू आसाराम बापूंची पत्नी आणि मुलीसमोर बसवून चौकशी करणार आहेत.

सुरतमधील दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी आराराम बापू आणि नारायण साईंसाठी आज दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आसाराम बापूंची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे गुजरात एटीएस आसाराम बापूंना आज गांधीनगर कोर्टासमोर उभं करणार आहेत.

मात्र त्याआधी सलग तिस-या दिवशी आसाराम बापूंची पत्नी आणि मुलीसमोर बसवून चौकशी करणार आहेत. तर दुसरीकडे बलात्काराचा आरोप असणारे फरार नारायण साईंच्या अंतरिम जामिनावर आज सुरत कोर्टात सुनावणी होणार आहे. गुजरात हायकोर्टातही आज आसाराम बापू आणि नारायण साईंच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये दोघांनी सुरतमधल्या दोन बहिणींनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 22, 2013, 11:20


comments powered by Disqus