Last Updated: Friday, December 6, 2013, 10:32
www.24taas.com, पीटीआय, चंडीगडएक्झिट पोलच्या माध्यामातून येणारे निष्कर्ष बिनकामाचे असतात, अशा शब्दांत काँग्रेसने हे निष्कर्ष फेटाळून लावले आहेत, तर आलेल्या निष्कर्षामुळे भाजपला पाचपैकी चार राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार असं दिसत असल्याने काँग्रेस निरुत्साही झाला असल्याची टीका भाजपने केली आहे.
विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळत असल्याचे निष्कर्ष हाती आले असून, केवळ दिल्लीमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी एक्झिट पोलचे निष्कर्ष फाडून फेकून देण्याच्या लायकीचे असल्याची टीका केली आहे. यावर भाजपचे नेते अरुण जेटली यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर काँग्रेसला पराभव दिसत असल्यामुळे नेते निराश झाले असल्याचा चिमटा काढला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 6, 2013, 10:32