Last Updated: Saturday, October 27, 2012, 23:31
www.24taas.com,नवी दिल्लीपंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निवासस्थानाबाहेर अपंगांनी निदर्शनं केली. यात एकानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक करत होते.
अरविंद केजरीवाल यांनी गेल्या आठवड्यात या विषयावर दिल्लीत रण माजवलं होतं. त्यानंतर दिल्लीतलं आंदोलन स्थगित करून खुर्शीद यांचा मतदारसंघ असलेल्या फिरोजपूरमध्ये जाऊन आंदोलन करण्याचंही जाहीर केलं होतं.
मात्र आज पुन्हा एकदा खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया अगेन्स्ट करप्शननं पुन्हा दिल्लीतच अधिक उग्र स्वरुपाची निदर्शनं केली.
मंत्रिमंडळ फेरबदल होऊ घातला असताना खुर्शीद यांचीही गच्छंती व्हावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
First Published: Saturday, October 27, 2012, 23:09