वादग्रस्त वक्तव्य : कुणी सांगून बलात्कार करतं काय? babulal guars controversial statement

वादग्रस्त वक्तव्य : कुणी सांगून बलात्कार करतं काय?

वादग्रस्त वक्तव्य : कुणी  सांगून बलात्कार करतं काय?

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ

मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते बाबूलाल गौर यांनी उत्तर प्रदेशातील अखिलेश यांचा बचाव करणारं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

बलात्काराच्या घटना रोखणे शक्य नाही, कारण कुणी काय सांगून बलात्कार करत नाही, असं बाबूलाल गौर यांनी म्हटलंय.

`बलात्कार करणारा सांगून जात नाही आणि हे एकांतात केलं जातं. कारण तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई केली जाते. तक्रार कधी खरी असते तर कधी खोटी असते, याला मुलायम आणि अखिलेश काय करणार`, असंही बाबूलाल गौर यांनी म्हटलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 5, 2014, 21:45


comments powered by Disqus