बापानं घेतला कडकडून चावा; चिमुरडीचा मृत्यू, Baby girl dies after dad bit off lips, nose

बापानं घेतला कडकडून चावा; चिमुरडीचा मृत्यू

बापानं घेतला कडकडून चावा; चिमुरडीचा मृत्यू
www.24taas.com, जयपूर

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधल्या हॉस्पीटलमधल्या चिमुरडीनं अखेरचा श्वास घेतलाय. काही दिवसांपूर्वी नशेत धुंद असलेल्या तिच्या जन्मदात्या पित्यानंच तिच्या नाकाचा आणि ओठाचा कडकडून चावा घेतला होता.

ओठाला आणि नाकाला गंभीर जखम झाल्यानं तिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी तिच्यांवरील ओठांवर पहिली प्लास्टिक सर्जरीही करण्यात आली होती. परंतू, अचानक या मुलीची तब्येत खालावली आणि डॉक्टर तिला वाचवण्यात अयशस्वी ठरले. या चिमुरडीच्या आईनं आपल्या पतीविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. बीकानेर पोलिसांनी या क्रूर पित्यावर ३०२ कलमाखाली खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.


आरोपी भादर सिंग याने २४ जानेवारी रोजी रात्री दारूच्या नशेत आपल्या पाच महिन्यालच्या चिमुरडीच्या ओठाचा कडकून चावा घेतला होता. एवढे करून हा नराधम पिता थांबला नाही. त्याने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीलाही चावा घेऊन तिला जखमी केले होते. गंभीर अवस्थेत दोघींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे चार दिवसांपूर्वीच त्या चिमुरडीच्या ओठावर प्ला्स्टिक सर्जरी झाली होती. बुधवारी सकाळी अचानक तिची तब्येचत बिघडल्यानंतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण, अखेर तीनं दम तोडला.


First Published: Thursday, February 7, 2013, 08:23


comments powered by Disqus