Last Updated: Thursday, November 8, 2012, 17:14
www.24taas.com, बंगळुरू बंगळुरूमधल्या एका प्रसिद्ध पेंट फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीनं उग्र रुप धारण केलंय.
‘एशियन पेंटस्’ या कंपनीच्या बंगळुरूच्या होसूर रोडवरील गोडाऊनला ही आग लागलीय. जवळजवळ २० फायर बंब ही आग विझवण्यासाठी झटतायत, अशी माहिती फायर ब्रिगेडचे अधिकारी एन यू एरप्पा यांनी दिलीय.
ज्वालांमुळे निघालेला धूर इमारतीच्या बाहेर पडून जवळजवळ आजूबाजूच्या एक किलोमीटर परिसरात पसरलाय. या रोडवर ट्राफिक जाम होऊन आग विझवणं आणखी कठिण होऊ नये, यासाठी पोलीस काळजी घेतायत.
First Published: Thursday, November 8, 2012, 13:49