Last Updated: Thursday, June 6, 2013, 15:17
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू बंगळुरूमध्ये बघणाऱ्यांना लाज वाटेल अशी घटना उघडकीस आलीय. एका ९० वर्षीय वृद्धाला बंगल्याच्या गच्चीवर साखळदंडानं गेल्या कित्येक दिवसांपासून बांधून ठेवण्यात आलं होतं... हा पराक्रम करणारा दुसरा-तिसरा कुणी नव्हता तर या वृद्धाचा मुलगाच होता. पोलिसांच्या मदतीनं या वृद्धाला बुधवारी सोडवण्यात आलं.
अनंत कुमार शेट्टी असं या ९० वर्षीय वृद्धाचं नाव आहे. गेल्या सात महिन्यांपासून बंगल्याच्या गच्चीवर एका तात्पुरत्या शेडखाली साखळदंडानं त्याला बांधून ठेवण्यात आलं होतं. ही गोष्ट उघड झाल्यानंतर शेट्टी यांच्या मुलानं ‘वडील आंघोळ करत नसल्यानं आणि घाणेरडे’ असल्यानं त्यांना साखळदंडानं बांधून ठेवलं होतं असं स्पष्टीकरण दिलंय.
पोलिसांनी या वृद्धाची सुटका केली असली तरी त्यांच्या मुलाला मात्र अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. शेट्टी यांचा जबाब नोंदवल्यानंतर कारवाईला सुरुवात होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. शेट्टी यांना बंगळुरुच्या एका सरकारी हॉस्पीटलमध्ये सध्या ठेवण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 6, 2013, 15:17