Last Updated: Monday, November 25, 2013, 09:06
www.24taas.com, वृत्तसंस्था, चेन्नईबंगळूरमध्ये एटीएममध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला होण्याची घटनेला काही दिवस उलटत नाही तोच चेन्नईमध्येही अशीची घटना घडली आहे. रेशनच्या दुकानात काम करणार्या एका महिलेवर हल्ला करून सोन्याची चेन आणि १५ हजार रुपये दोन चोरट्यांनी पळविले.
शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही महिला रेशनच्या दुकानामध्ये एकटी होती. त्यावेळी दोघे जण दुकानात घुसले आणि त्यांनी शटर खाली ओढून घेतले.
चाकूच्या धाकाने त्या महिलेच्या अंगावरील दागिने आणि रोख रक्कम लुटली. चोरट्यांनी त्या महिलेला मारहाण केल्याने ती बेशुद्ध झाली. दुकानाचा मालक घटनास्थळी आल्यानंतर त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 25, 2013, 09:06