बॅंक कर्मचाऱ्यांचा २० रोजी संप, Bank organization, announced the closing of

बॅंक कर्मचाऱ्यांचा २० रोजी संप

बॅंक कर्मचाऱ्यांचा २० रोजी संप
www.24taas.com,नवी दिल्ली

सरकारने लोकसभेत मांडलेल्या बँकिंगविषयक विधेयकाचा विरोध करण्यासाठी २० डिसेंबरला संप पुकारण्यात आलाय. त्यामुळे बॅंकांचे व्यवहार बंद राहणार असल्याने याचा फडका सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना बसणार आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे या तीन संघटनांनी हा संप पुकारलाय.

यामध्ये देशभरातील सर्व प्रकारच्या बँकांचे अंदाजे सात लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. परिणामी रिझर्व्ह बँकेसहित संपूर्ण बँकिंग क्षेत्रातील व्यवहार बंद राहणार आहेत.

First Published: Sunday, December 16, 2012, 12:52


comments powered by Disqus