Last Updated: Wednesday, August 22, 2012, 16:18
www.24taas.com,मुंबई बँक कर्मचा-यांनी देशव्यापी संप पुकारलाय. संपात देशातल्या बहुतांश बँक कर्मचारी संघटनांचा सहभाग आहे. त्यामुळं बहुतांश बँकांचे कारभार ठप्प झालेत.
कर्मचा-यांनी सरकारी धोरणाला विरोध करण्यासाठी विविध ठिकाणी मोर्चे आणि धरणे आंदोलन केलं. दिल्लीतही धरणे आंदोलन करण्यात आलं. तर एरव्ही गजबजलेल्या मुंबईच्या बँका आज बंद होत्या. बँक परिसरात शुकशुकाट होता. तर दुसरीकडं औरंगाबादमध्ये बँक कर्मचा-यांनी आंदोलन केलं.
सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचा-यांनी आजपासून दोन दिवसांचा संप पुकारलाय. या संपात देशभरातले दहा लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी सहभागी झालेत. तर संपामुळं बँकांच्या जवळपास ७५ हजार शाखांचे व्यवहार ठप्प होणार असल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केलाय. तर ९० हजार एटीएमची सेवाही विस्कळीत होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येतयं.
संपामुळं दोन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प राहणारेत. तीन दिवसांच्या चेक क्लिअरिंगसारख्या व्यवहारांना यावेळी आठ दिवस किंवा आठवडा लागण्याची शक्यता आहे
First Published: Wednesday, August 22, 2012, 16:18