बँक संपाने आर्थिक व्यवहार विस्कळीत , Bank staff strike

बँक संपाने दुसऱ्या दिवशी व्यवहार विस्कळीत

बँक संपाने दुसऱ्या दिवशी व्यवहार विस्कळीत
www.24taas.com,नवी दिल्ली

बँकेच्या संपाचा आज दुसऱ्या दिवशी ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दोन दिवस देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संपावर गेल्यामुळे अनेक आर्थिक व्यवहार विस्कळीत ठप्प पडले आहेत.

बँकिंग क्षेत्रातील सुधारणा आणि आऊटसोर्सिंगला असलेल्या विरोधामुळे हा संप पुकारण्यात आला. ज्यामुळे सर्व बँक सुविधांवर याचा परिणाम दिसून आला. ग्राहक सेवा, आयात-निर्यात, परदेशी चलनाची देवघेव, चेक क्लिअरिंग यासारख्या बँकेच्या सर्व व्यवहारवर परिणाम झाला आहे. बँका बंद असल्यामुळे ग्राहकांची गर्दी एटीएमकडे होती. काही एटीएममधील पैसे संपल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. आज संपाचा शेवटचा दिवस आहे.

देशभरातील १० लाख बँकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला. या संपात २७ सरकारी, १२ खाजगी आणि ८ परदेशी बँकांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दोन दिवसांच्या या संपामुळे अर्थव्यवस्थेला काही हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

First Published: Thursday, August 23, 2012, 17:02


comments powered by Disqus