जेव्हा ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकतात?Barack Obama watching Narendra Modi speech on TV?

जेव्हा ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकतात?

जेव्हा ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकतात?
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

ऐकलंत का... "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा नमो-नमो करतायेत", खाली असलेल्या बनावटी फोटोचं हे कॅप्शन आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. यात बराक ओबामा टीव्हीवर नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत आहेत, असं दिसतंय.

हा मूळ फोटो आहे २८ जानेवारी २०११चा, जेव्हा इजिप्तचे राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचं भाषण ओबामा टीव्हीवर पाहत होते. व्हाईट हाऊसमधील हा फोटो तिथल्या फ्लिकर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला होता.

आता या फोटोसोबत छेडखानी करत होस्नी मुबारक यांच्या जागी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा फोटो टाकण्यात आलाय. जो की बराक ओबामा टीव्हीवर भाषण ऐकत आहेत, असं दर्शवतो.

हा फोटो गुजरातचे भाजपचे नेते आणि मोदी समर्थक सी. आर. पाटील यांच्या फेसबुक पेजवर आहे. जेव्हा पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी हा फोटो बनावट असल्याचं सांगितलं. या फोटोद्वारे आम्ही मोदींची प्रतिमा मलिन का करु? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा फोटो कोणी शेअर केला याचा शोध घेऊ, असंही पाटील म्हणाले.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 13:44


comments powered by Disqus