Last Updated: Wednesday, June 26, 2013, 16:00
b> www.24taas.com, झी मीडिया, शिलाँग
आपल्या सावत्र मुलीवर गेली नऊ वर्ष पोलीस काँस्टेबल बलात्कार करीत असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पोलीस असणाऱ्या तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केलेय.
शिलाँगमध्ये राहणाऱ्या या पिडीत दुर्दैवी मुलीला त्याच्यापासून एक मुलगा झाला आहे. एका सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून ही बाब उघड झाली आहे. त्यानंतर काँस्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पी. जी. मोमिन याला त्याच परिसरातून अटक करण्यात आली. त्यांने पहिलांदा आपल्या सावत्र मुलीवर २००४मध्ये बलात्कार केला.
पूर्व खासी हिल्स जिल्हा पोलीस अधिक्षक एम. खारकरांग यांनी सांगितले की, या पोलीस काँस्टेबलला अटक करण्यापूर्वी आम्ही आधी गुन्हा दाखल केला. सावत्र मुलीचे वय २१ असून तिला नऊ वर्षांचा एक मुलगाही आहे. कोणाला याबाबत काहीही सांगायचे नाही, असे या पोलीस काँस्टेबलने तिला धमकी दिली होती.
सिव्हील सोसायटी वूमेन्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आग्नेश खारशिंग यांनी सांगितले की, २१ वर्षीय पिडीत महिलेले आमच्या सदस्य महिलेला याबाबत माहिती दिली. त्यानंतर आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही बाब उघड झाली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, June 26, 2013, 11:55