Last Updated: Monday, November 25, 2013, 15:33
www.24taas.com, झी मीडिया, बेळगावबेळगावात कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजी पाटील आणि खानापूरचे अरविंद पाटील यांनी मराठी आणि हिंदी भाषकांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यास मराठीतून सुरूवात केली.
यावेळी इतर आमदारांनी विरोध करून कन्नड भाषेचा आग्रह धरला. त्यामुळे अरविंद पाटील आणि संभाजी पाटील यांनी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे अशी घोषणाबाजी करून सभात्याग केला.
आमदारांनी सभात्याग केल्यामुळे संतप्त झालेल्या कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी आमदार संभाजी पाटील यांच्या कार्यालयावर दगडफेक केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 25, 2013, 15:25