बेळगाव पालिकेकडे लक्ष, मतमोजणीस सुरूवात, Belgaum palika election

बेळगाव पालिकेकडे लक्ष, मतमोजणीस सुरूवात

बेळगाव पालिकेकडे लक्ष, मतमोजणीस सुरूवात
www.24taas.com,बेळगाव

बेळगाव महापालिकेच्या 56 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झालीये. बेळगावातल्या डी.के. मॉडेल स्कूलमध्ये ही मतमोजणी होतेय.

बेळगाव महापालिकेत 58 जागा असून त्यापैकी दोन जागांवर एकीकरण समितीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळं 56 जागांसाठी मतदान झालंय.

बेळगावात 45 टक्के मराठी ,35 टक्के कन्नड आणि 20 टक्के उर्दु भाषिक मतदार आहेत. यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्ये म्हणजे यंदा कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात नाहीये. निकालानंतर मराठी भाषिक आणि कन्नड भाषिकांमध्ये कोणताही संघर्ष होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

या निवडणुकीत सर्व मराठी भाषिक मतदार एकजुटीने रिंगणात उतरले होते. आता बेळगाव महापालिकेवर मराठी भाषकांचा झेंडा फडकणार का हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

First Published: Monday, March 11, 2013, 09:40


comments powered by Disqus